Share

तहसीलदारांकडून दुकान उघडण्यास परवानगी कधी मिळणार ?

Published On: 

लातूर : २० एप्रिल ते ३ मे २०२० या कालावधीत लाॕकडाऊनमध्ये व्यवसाय चालू करण्यासाठी निलंगा तालुक्यातील संबंधित व्यापा-यांनी तहसीलदार यांच्याकडे पीडीएफ फाॕरमॕटमध्ये व्हाट्सअपव्दारे अर्ज सादर केले आहेत.परंतू २-३ दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्याप पासेस न मिळाल्याने सुधारीत आदेश निघूनही संबंधित दुकाने सुरु न झाल्याने शेतक-यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.लाॕकडाऊनमध्ये प्रशासनाकडून दवाखाना,मेडीकल,किराणा माल,भाजीपाला आदी अत्यावश्यक सेवा व सुविधा सकाळी ८ ते ११ यावेळेत चालू करण्यास मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, २० एप्रिल ते ३ मे २०२० या कालावधीसाठी सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.या नव्या आदेशानुसार कृषी व कामगार आदीशी संबंधित काही व्यवसाय चालू करण्यास सरकाने मुभा दिली आहे.परंतु त्यासाठी तालुक्यातील व्यवसायिकांनी तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करुन पास मिळविणे बंधनकारक आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक व्यवसायिकांनी तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज सादर केले आहेत.पास मिळविण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे व्हाट्सअपव्दारे अर्ज सादर करुन २-३ दिवसाचा कालावधी झाला आहे.परंतु आमच्या अर्जास अद्याप काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचे येथील व्यापा-यांनी सांगितले.तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा बिकट झाला आहे.मशीनरीचे दुकाने लाॕकडाऊनमुळे बंद असल्याने विद्युत मोटार,पाइप,केबल,स्टारटर उपलब्ध होत नसल्याने पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.दरम्यान सुधारीत आदेशानुसार काही व्यवसाय चालू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र संबंधित परवानगी मिळविणे फारच क्लिष्ट प्रक्रीया आहे.त्यामुळे दुकान चालू करण्याचा पास मिळण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करुनही अद्याप शहरासह तालुक्यात कोणत्याही दुकानदाराला दुकान चालू करण्याबाबतचा तहसील कार्यालयाचा पास प्राप्त झालेला नाही.पास मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर केलेले दुकानदार पासच्या प्रतिक्षेत आहेत.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने तहसीलदार गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त अर्जदारांना पास देण्याची प्रक्रिया चालू असून २-३ दिवसात संबंधित दुकानदारांना पास वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई व पुणे येथून गावी कोणी आल्यास तत्काळ प्रशासनास कळविण्याचे आवाहन तहसीलदार जाधव यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.निलंगा तालुका कोरोनामुक्त झाला असल्याचे सांगून मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरातून एखादी व्यक्ती आपल्या गावी आली असेल तर अशी माहिती लपवून ठेवू नका.स्थानिक प्रशासनाला माहिती देवून प्रशासनास सहकार्य करा व कोरोनाचा संसर्ग टाळा असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!