🕒 1 min read
मुंबई : १९ मार्च हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आदी विषयांवरून त्यांनी केंद्रावर टीका करताना मोदी सरकारची तुलना कुंभकर्णाशी केली आहे.
‘शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. मात्र, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’ अशी टीका जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.
शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे.
केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?#WorldSleepDay
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 19, 2021
सांगली नंतर जळगाव महापालिकेतही भाजपला झटका !
१८ मार्च रोजी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक पार पडली आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, बहुमत असूनही या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव तर शिवसेनेचा विजय झाला आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत देखील जयंत पाटील यांच्या खेळीमुळे भाजपला असाच पराभव सहन करावा लागला होता. भाजपच्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मत न देता विरोधातील पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपला मोठा दणका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डीसीसीनिमित्त शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; आता आठवलेही पाठवणार शाहांना पत्र
- पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली ? सूर्यकुमारनं सांगितलं गुपित !
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- गेले काही दिवस जादूई आहेत ; बुमराहने मानले चाहत्यांचे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
