🕒 1 min read
मुंबई : आपल्या गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन सोबत लग्न झालं. १५ मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले. जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. आहे. या सर्वांचे बुमराह आणि संजनाने आभार व्यक्त केले आहे.
The last few days have been nothing short of absolutely magical! We are so grateful for all the love & wishes we’ve received. Thank you. pic.twitter.com/dhWH918Ytu
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) March 19, 2021
‘गेले काही दिवस हे जादूमय होते. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहेत, धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया बुमराहनं ट्विट करत दिली आहे. त्यानंतर संजना गणेशननं देखील ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. ‘गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, तो अभुतपूर्व आहे. आम्ही तुमच्या सर्वांचे मेसेज आणि शुभेच्छा वाचत असून त्या खूप आनंद देणाऱ्या आहेत. धन्यवाद,’ या शब्दात संजनानं सर्वांचे आभार मानले आहेत.
Overwhelmed by all the love we’ve been showered with over the last few days. We’ve been reading all your messages & wishes with the biggest smiles on our faces! Thank you. pic.twitter.com/13ykcffi9Z
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 19, 2021
संजना मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले. तसेच संजना ही २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- डीसीसीनिमित्त शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
