Share

डीसीसीनिमित्त शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेमधील दोन मंत्री एक आमदार यांनी भाजपसोबत संधान बांधुन शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रीत मोट बांधली आहे. या वेळी शिवसेनेच्या अंतर्गंत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

दरम्यान औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसुल राज्य मंत्री अब्दुल सत्तार तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतिष चव्हाण, माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांची टीम पुर्णपणे भाजप म्हणजेच हरिभाऊ बागडे यांच्या सोबत गेली आहे. तर या मंडळींनी महाविकास आघाडी विरुद्धच्या अधिकृत शेतकरी सहकार बँक विकास पॅनलच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. आणि यावेळी यावर तोडगा म्हणून काँग्रेसने शिवसेनेचा हुकमी एक्का म्हणजेच माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना या निवडणुकीत उतरवले आहेत.

या शेतकरी विकास पॅनलमध्ये आलेले अब्दुल सत्तार हे शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल झाले काय आणि त्यांना राज्य मंत्रीमंडळामध्ये महसुल राज्यमंत्री हे खाते देखील मिळाले. तर दुसरीकडे संदीपान भूमरे हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून समजल्या जातात. तर यांना ग्रामीण भागाशी नाळ असल्यामुळे मिळालेले रोजगार हमी योजना व फल्लोत्पादन हे खाते मिळाले. दरम्यान अंबादास दानवे हे नेहमी चंद्रकांत खरै आणि स्वत:च्या शाब्दिक चकमकीमुळे आेळखले जातात. आणि सतिष चव्हाण हे हॅट्रीक करुन तिसऱ्यांदा विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार झाले आहेत. तर अश्या दिग्गज आणि धुरंधर राजकारणी विरोधी पक्षाला जावून मिळाल्यामुळे आता शेतकरी विकास पॅनल यात बाजी मारते का ? शेतकरी सहकार बँक विकास पॅनल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

खरे तर कोणतीही निवडणुक आली तरी शिवसेनेमधील असलेली धुसफुस ही नागरिकांसह मतदारांना नवीन नाही. तर चंद्रकांत खैरेंनी पक्षांतील निष्ठावंत आणि आयाराम विरोधी पक्षाला जावून मिळाल्याने दुख: व्यक्त केले. तर आपण त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव करणार असल्याचे दंडही त्यांनी या वेळी थोपटले देखील आहेत. या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून समारे आलेली शिवसेनेतील धुसफुस पुन्हा पाहावयास मिळाली हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!