अमरावती- शासनाने शेतकऱ्याची थट्टाच लावली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना रांग लावून हाल अपेष्टा सहन करून कापसाची विक्री केली. परंतु 31 मे 2020 नंतर विकलेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांला अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही. कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार असा सवाल माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अवस्था दयनीय झाली आहे. कापूस उत्पादक संघांनी वाढीव ग्रेडरची मागणी डिसेंबर पासून केली होती पण शासनाने ग्रेडर वाढवून दिले नाही. परिणामी लॉकडाऊनच्या अगोदर अतिशय कमी प्रमणात कापसाची खरेदी झाली लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांना कापूस स्वतःच्या घरातच भरून ठेवावा लागला केंद्र सरकारने कापसाच्या खरेदी करिता पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा राज्य सरकार परिणामकारक रित्या कापूस खरेदीची यंत्रणा राबवू शकले नाही.
शेतकऱ्यांचा कापसाच्या गाड्याच्या रांगाच रांगा खरेदी केंद्रावर दिसून येत होत्या. तीन-तीन दिवस पर्यंत थांबावे लागल्याने शेतकऱ्याला गाडी भाड्याचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागला कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला व भ्रष्टाचाराला तोंड द्यावे. लागले एवढे सर्व दिव्य पार करूनही 31 मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही.
ऑगस्ट महिना संपत असून बँका पीककर्ज देत नाही आणि कापसाचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून शासनाने तातडीने कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी माजी कृषीमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत’
‘मी पुन्हा येईल’ हा डायलॉग बिहारमध्ये ‘हम फेर आईम’ असा म्हणावा लागेल…
मोठी बातमी: पवार कुटुंबियांची महत्वाची बैठक, नाराजीवर तोडगा निघणार कि वाद वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

