Share

‘मी पुन्हा येईल’ हा डायलॉग बिहारमध्ये ‘हम फेर आईम’ असा म्हणावा लागेल…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत.आता राजकीय पक्षांनी देखील व्युव्हरचना आखायला सुरुवात केली असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

पुढच्या काही महिन्यातच बिहार विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे बिहार प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पक्षातील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, भाजपकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान,याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्या या संभाव्य नियुक्तीची खिल्ली उडवली आहे. ‘महाराष्ट्रातून बिहारला जाताना ‘मी पुन्हा येईल’ हा डायलॉग बिहारमध्ये "हम फेर आईम" असा म्हणावा लागेल, फक्त एवढच सुचवायचं होतं’. असं ट्विट करत मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

तर दुसरीकडे दरम्यान,याच मुद्द्यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ट्वीट करत त्यांनी फडणवीसांना लक्ष्य करताना ते म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात फडणवीस जींच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल. भाजपा ने महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद! सन्माननीय फडणवीस जींना शुभेच्छा- “दिल्याघरी सुखी रहा”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!