Share

‘सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत’

Published On: 

मुंबई : सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘मार्मिक’च्या हिरक महोत्सवानिमित्त त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. उद्धव यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीसोबतचे संबंध, सरकार पाडण्याबद्दल भाजपा नेत्यांकडून केली जाणारी विधानं याचे पडसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात उमटले. एरवी आपण मेळाव्यात भेटतो तेव्हा तुम्ही सारे समोर असता. आज या ऑनलाइन मेळाव्यात सोबत आहात, पण दिसत नाहीत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक विधान ठाकरेंनी केलं.

राज्यात आत्तापर्यंत ४ लाखांहून अधिक रुग्ण झाले ठणठणीत बरे !

‘मार्मिक’ या नियतकालिकास ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका ऑनलाइन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे शिवसैनिकांशी व महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मीपण नुकताच ६० वर्षांचा झालो व मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते ६० वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.

कुरापती करणाऱ्या चीन-पाकला मोदींनी दिला सज्जड दम!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!