Share

महेश बाबूने केली १ कोटींची मदत,मराठी आणि बॉलीवूडमधील कलाकारांना कधी होणार जाणीव ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह दक्षिणेतील काही राज्यांमध्ये मोठे नुकसान केले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय सुपरस्टार महेश बाबूने पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला आहे. महेश बाबूने तेलंगना सीएम फंडमध्ये १ कोटी रूपयांची रक्कम जमा केली आहे.

स्वत: महेश बाबू याने ट्विट करून दिली. तसेच त्याने पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी सर्वांनी समोर यावं असं आवाहनही केलं आहे.दरम्यान, इकडे महाराष्ट्रात देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले असून मराठी सिनेकलाकार तसेच बॉलीवूड कलाकार यापैकी कोणीही पुढे येवून मदत करताना दिसत नाहीये.

पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, मागील दोन – तीन वर्षांपासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे तसेच बोगस बियांण्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. या हंगामामध्ये पिके चांगली आली होती, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदील झाला आहे.

खर तर मुंबईतील सिनेसृष्टी इतर कुठेही हलवू देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत मात्र याच सिनेसृष्टीतील कलाकारांची राज्यातील शेतकरी संकटात असताना मदत करण्याची नैतिक जबाबदारी नाही का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. फक्त कलाकार नव्हे तर इतर क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत आज बळीराजाला मदत करण्याची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!