मुंबई : कोकण आणि परिसरातील जिल्ह्यांना अतिवृष्टीने झोडपले आहे. परिसरातील नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानिची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी या भागाचे दौरे केले आहेत. मात्र, पूरग्रस्तांना मदत करण्याचे केवळ आश्वासन देण्यात येत आहे. या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर पत्रकार परिषद सोडून जातांना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
कोकणात नैसर्गिक संकट वारंवार येत आहे. त्यात वीज यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्याने तेथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे देखील डॉ. राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र, नेमकी पूरग्रस्तांना मदत कधी जाहीर करणार या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळले.
डॉ. राऊत यांचा तोच व्हिडीओ समाज माध्यमावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पूरग्रस्तांना नेमकी मदत कधी जाहीर करणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, डॉ. राऊत यांनी प्रश्नाला उत्तर न देताच पत्रकार परिषदेमधून निघून जाणेच पसंत केले. या मुद्यावरुन विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजयजी मी राणीच्या बागेतील पेंग्वीनबद्दल बोलतीये…तुम्हाला कुठला पेंग्विन वाटला ?
- ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार,नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात घोषणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

