नवी दिल्ली : १९ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
अशातच पेगासास प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्ष एकवटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चेसाठी देखील निमंत्रित केल्यानंतर चर्चा न करता विरोधकांनी आपला गोंधळ हा कायम ठेवला आहे.
अधिवेशनात जनतेच्या हिताच्या निर्णयावर चर्चा होत नसल्याने भाजपने विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, जे खासदार गोंधळाची परिसीमा पार करतील त्यांचे दोन वर्षांचे निलंबन करावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाचा समर्थक सदस्य असो वा विरोधक दोघांबाबत हा निर्णय लावण्यात यावा असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
संसदेचे कामकाज रोखणे अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचे कामकाज रोखल्यामुळे देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करावा.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 29, 2021
‘संसदेत जे खासदार सलग तीन दिवस गोंधळ घालून चौथ्या दिवशीही संसदेत गोंधळ घालून कामकाज रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम करण्यात यावा. सरकार पक्षाचा खासदार असो अथवा विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांना हा नियम लागू करावा. संसदेचे कामकाज रोखणे अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचे कामकाज रोखल्यामुळे देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करावा,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम; राजेश टोपेंनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

