मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणावर भाष्य करणारा रोखठोक अग्रलेख लिहित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नागरिकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात असल्याचं म्हणत हे कुणी केलंय, याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे, असं राऊत म्हणाले. एकंदरित केंद्र सरकारवर भडकलेल्या राऊतांना चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिलं.
आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळं ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला, का आणि कोणासाठी?, असा सवाल करत संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा, असं चित्रा वाघ ट्वीट करून म्हणाल्या.
यानंतर एका संजय शिंदे नावाच्या वाचकाने चित्रा वाघ यांना त्यांनी वापरलेले शब्द मागे घेण्यास सांगितले. ते म्हणाले, ताई तुम्ही पेंग्विन बोलताय उद्या आमचा कडुन एखादा शब्द वाईट आला की बोलाल महिलेंचा सन्मान ठेवत नाही,तस तुम्ही पण बोलत जा,बोललेले शब्द परत घ्या अशी विनंती वाचकाने केली.
अहो संजयजी मी राणीबाग भायखळा इथे ठेवलेल्या पेंग्वीनबद्दल बोलतीये..जिथे डोरी पेंग्वीनचा मृत्यू झाला
तुम्हाला कुठला पेंग्विन वाटला……???? https://t.co/LT2CX0NKXJ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 29, 2021
यानंतर चित्रा वाघ यांनी या वाचकाला ट्वीट करून रिप्लाय केला आहे. त्या म्हणाल्या, अहो संजयजी मी राणीबाग भायखळा इथे ठेवलेल्या पेंग्वीनबद्दल बोलतीये..जिथे डोरी पेंग्वीनचा मृत्यू झाला. तुम्हाला कुठला पेंग्विन वाटला……असा रिप्लाय वाघ यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

