🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आणि राणेंच्या घराण्याचा वाद हा वारंवार समोर आला आहे. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून राणे कुटुंबीय हे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे हे शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात.
आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या वर्तनावरून राणे कुटुंबीयांनी प्रहार केला होता. तसेच, उद्धव ठाकरे यांचा देखील एकेरी उल्लेख केला होता. आता भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर पलटवार केला आहे. शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवल्याचा खोचक टोला जाधव यांनी लगावला आहे.
यासोबतच, ‘नारायणराव राणेंना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असंच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या महाराष्ट्रात पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतभिन्नता असू शकते. पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण राणेंबद्दल बोलायला मला इच्छासुद्धा होत नाही.’ असं भाष्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- ‘नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?’
- ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम; राजेश टोपेंनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
