Share

“मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात कमकुवत…”, ‘त्या’ वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया

Published On: 

नवी दिल्ली: पंजाब निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपं सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून वा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत असा टोलाही मोदींना लगावला. त्यांच्या या व्हिडिओनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांना भारताला सर्वात कमकुवत बनवल्याबद्दल आणि देशातील महागाई वाढवल्याबद्दल ओळखले जाते. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. पण मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलत आहात काय?”, असा सवालही निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

नेमके मनमोहन सिंह काय म्हणाले?

“एकीकडे जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत, तर दुसरीकडे गेल्या साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान सरकार आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी पंतप्रधान नेहरूंना दोष देत आहे.”, अशा शब्दांत मनमोहन सिंह यांनी मोदींना सुनावले आहे.

तसेच लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनची घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. तसेच नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून किंवा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, हे आता पंतप्रधान मोदींना एव्हाना समजले असेल. त्यामुळे सत्य कधी ना कधी बाहेर येते. मोठमोठय़ा गप्पा मारणे सोपे असते, मात्र त्या प्रत्यक्षात आणणे कठीण असते, असा टोलाही मनमोहन सिंह यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!