पुणे : येत्या काहीच दिवसात महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहरात आधी ११ आणि नंतर २३ अशी एकूण ३४ नवीन गाव समाविष्ट झाल्याने पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे. त्यामुळे या वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुणेकरांना एकूण १७३ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
महाराष्ट्रात जो सत्तेवर असतो त्याचा नेहमीच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर प्रभाव पडत असतो. असाच काहीसा प्रकार यावेळी पण घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला अनुकूल असे नवीन प्रभाग पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडून घेतले आहेत. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहा हत्तींचे बळ संचारले आहे. राष्ट्रवादी पक्षाने आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयावर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा सुरु करताच शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने पण आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिका ही महाविकास आघाडी एकत्र लढेल असे चित्र निर्माण केले गेले. मात्र पुणे महानगरपालिकेसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर होताच आणि ती आपल्याला अनुकूल आहे हे कळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये आमचे १२२ नगरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केल्यावर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने पण स्वबळाची भाषा बोलायला सुरूवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “असं वाटतंय विरोधक दररोज रात्री कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करतात”, केजरीवालांचे टीकास्त्र
- किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच सेना-भाजप आमने-सामने; शिवसैनिकांनी गोमूत्राने केले शुद्धीकरण
- भारतीय महिला संघाविरुद्ध न्यूझीलँडने केली विजयाची हॅट्ट्रिक
- खा. गिरीष बापट यांच्या घराबाहेर काँग्रेस कमिटीच्या वतीने “माफी मागो” आंदोलन
- IND vs WI: तिसऱ्या टी- २० सामन्यासाठी ईडन गार्डनवर असणार चाहत्यांची उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

