औरंगाबाद: आज शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली की, औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा मनपाने थकबाकी न भरल्यामुळे सदरील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अभियंता दीपक डोंगरे यांनी दिली आहे. यासंदर्भात मनपाने शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्यांनी नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी कर भरले नाही त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली आहे.
२१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले असून, जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टीबद्दल महापालिकेला नोटीस पाठवून पाणीपट्टी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून जायकवाडी धरणातील पाणीउपसा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.तर मनपाने सांगितले की, शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
