नाशिक : आज वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाच भडका पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते आज वीज बिलांची होळी करणार असून, पुण्यामध्ये होळी पेटवून आंदोलन सुरु केले आहे. पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार.
तर नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला. लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज नागपूर जिल्ह्यात भाजपनं आंदोलन केलं. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची यावेळी होळी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम ९० टक्के पूर्ण…
- ‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचे जोरदार टीकास्त्र
- तयार रहा ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार याद्या !
- काळजी घ्या अन्यथा लॉकडाऊन अटळ, मुख्यमंत्र्यांचा इशारा
- वाढीव वीज बिल विरोधात आंदोलनाचा भडका; भाजप आज वीज बिलांची पेटवणार होळी


