🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.
सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. तसेच त्यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घातला होता. महेश महाराज यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावरुन सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “वारकऱ्यांकडून माझी प्रेतयात्रा काढण्यात आली. इतिहास साक्षी आहे, या देशात अनेक समाज सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आल्या. भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायातील भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही.”
“माझी अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न झाला. आता हे अंत्ययात्रा काढणारे लोक कोण आहेत तेही मी सांगितलं पाहिजे. अशी अंत्ययात्रा खऱ्या वारकरी संप्रदायात बसत नाही. किंबहुना अंत्ययात्रेत कुणीही भगवा फेटा घालून बसत नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “समृद्धी महामार्गावरील टोल वसुली पेक्षा विमान प्रवास स्वस्त”; जयंत पाटलांचा खोचक टोला
- Sanjay Raut | “हेंमत गोडसे मच्छर आहे, त्याला कोणीही…” ; संजय राऊतांची जहरी टीका
- Sanjay Raut | “आमचे सरकार आल्यावर बच्चू कडू आमच्या सोबत येतील”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Bacchu Kadu | सभेतून बोलल्याने मत मिळत नाहीत ; बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका
- Ravi Rana | पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या बदलीवर रवी राणा यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

