Share

Kane Williamson | कसोटी कर्णधार पदावरून विल्यमसनचा राजीनामा, कोण असेल न्युझीलंडचा नवा कर्णधार?

Published On: 

🕒 1 min read

Kane Williamson | टीम महाराष्ट्र देशा: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्व करणारा केन विल्यमसन (Kane Williamson) याने कर्णधार पदावरून राजीनामा दिला आहे. यानंतर आता न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितल्यानुसार, केन विल्यमसनने राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी न्यूझीलंड संघाचे कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणार आहे. तर टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे उपकर्णधार पद सांभाळणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केन विल्यमसन न्युझीलँडचे नेतृत्व करणार आहे.

वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून 32 वर्षीय केन विल्यमसनने हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघाचा टीम साऊथी हा 31 वा कसोटी कर्णधार आहे. टीम साऊथीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ या महिन्यात पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. हे सामने 26 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणार आहे.

सहा वर्ष कसोटी कर्णधार पद सांभाळल्यानंतर केन विल्यमसन राजीनामा देत आहे. 2016 मध्ये ब्रेंडन मॅक्युलमनंतर केन विल्यमसनकडे कर्णधार पदाचा भार सोपवण्यात आला होता. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

केन विल्यमसनने तब्बल 38 सामन्यांमध्ये न्युझीलँड संघाचे नेतृत्व केलेले आहे. तर त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 12 कसोटी सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड संघाने विल्यमसनच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियनशिप आपल्या नावावर गेली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!