मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. उर्फी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे देखील कायम चर्चेत असते.
दरम्यान, उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या ड्रेसबद्दल दुहेरी अर्थ सांगताना दिसत आहे. तिने नुकताच एक विचित्र ड्रेस घातला होता, ज्यावर तिने कॅमेऱ्यासमोर एक अतिशय विचित्र गोष्ट सांगितली. उर्फीचा दुहेरी अर्थाने बोललेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CezB7PoqYeS/
उर्फीला दररोज ट्रोलिंगला सामोरे जावे लागते पण ती या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. उर्फी तिच्या कामापेक्षा तिच्या फोटोंमुळेच जास्त चर्चेत असते. उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.
महत्वाच्या बातम्या :


