Share

“फडवणीस साहेब तुमचा मुख्यमंत्री होण्याचा आजार गंभीर झालाय लवकर…”, रुपाली ठोंबरेंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्री क्षेत्र देहू गाव येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात अनेक राजकीय घटना पहावयास मिळाल्या. हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रित केले नसल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस साहेब तुमचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झाला आहे. लवकर उपचार करा. PM साहेबांसमोर तुम्ही राजकीय, संविधान शिष्टाचार जाणून बुजून विसरत आहात, भंग करत आहात. हे तुमच्या सारख्या हुशार आणि सुसंस्कृत नेत्याला अशोभनीय नाही का?(मन की बात)”, असे ट्वीट करत रुपाली ठोंबरे यांनी खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान देहू येथील कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्याही मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला होता. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

अजित पवारांना भाषणाची संधी नाही-

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भाजपचे स्पष्टीकरण-

देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!