मुंबई : यजुर्वेंद्र चहल यावेळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा भाग नाही. राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात घेतले. आरसीबीने चहललाही रिटेन केले नाही आणि त्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चहलने सांगितले, की त्याला कायम ठेवण्याबाबत सांगण्यात आले नव्हते.
टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना चहल म्हणाला, ”मी आरसीबीशी भावनिकरित्या संलग्न आहे. मी इतर कोणत्याही संघाकडून खेळेन असे कधीच वाटले नव्हते. सोशल मीडियावर लोक आणि चाहते अजूनही मला विचारत आहेत की तू इतके पैसे का मागितलेस? वस्तुस्थिती अशी आहे की माईक हेसन (RCB क्रिकेट संचालक) यांनी मला फोन केला आणि म्हणाला (कोहली, सिराज, मॅक्सवेल) हे तीन रिटेन्शन आहेत.”
चहल म्हणाला, ”मला रिटेन करण्याबाबत विचारण्यात आलेले नव्हते. त्यांनी कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे सांगितली आणि मी लिलावात उतरेन असे सांगितले. मला ना ठेवण्याबद्दल विचारले गेले ना पैशाबद्दल. मी माझ्या बंगळुरूच्या चाहत्यांशी नेहमीच एकनिष्ठ राहीन. ते काहीही असो, मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम करेन.”
आयपीएलच्या लिलावात चहलचा राजस्थान रॉयल्सने समावेश केला आहे. बंगळुरूमध्ये असताना चहलने दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना संघाला अनेकवेळा विजय मिळवून दिला. मात्र, तो आरसीबीला विजेता बनवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
- “…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
- IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!
- “देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं
- भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”
- IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन; पाहा VIDEO


