पुणे : महाराष्ट्र व गोवा राज्यांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे राज्यात डिसेंबरमध्ये ‘सेट’ परीक्षा घेण्यात आली होती. या सेट परीक्षेचा निकाल मार्च अखेरपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सेट परीक्षार्थ्यांना असलेल्या निकालाची चिंता आता लवकरच संपणार आहे.
सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट २७ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला ११ हजार २०५ विद्यार्थ्यांनी एसईबीसी संवर्गातून परीक्षा अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला.
सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. परंतु, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसमोर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून एसईबीसीचा आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय दिला. केवळ ७१५ विद्यार्थ्यांनी खुल्या संवर्गाचा पर्याय स्वीकारत असल्याचे सांगितले. तर, २ हजार २३७ विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसचा पर्याय स्वीकारला. कोणताही पर्याय न कळवलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आपोआपच खुल्या संवर्गात होणार आहे, असे सेट विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- TRP प्रकरणातही ‘त्यांनी’ खंडणी वसूल केली होती का? – आशिष शेलार
- विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग !
- ‘येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल’
- सचिन वाझेंसह वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी नितेश राणे का करत आहेत ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

