मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
सचिन वाझे यांची कोठडीत रवानगी झाल्यानंतर पोलीस विभागाने त्यांच्यावर निलंबनाची केली आहे. याशिवाय एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या असताना राजकीय वर्तुळात देखील मोठा गदारोळ सुरु झाला आहे. याप्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीवर घणाघात सुरूच ठेवला आहे.
आता, भाजपा नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी एक ट्विट करून टीआरपी घोटाळ्याच्या तपासावर देखील पसंशय घेतला आहे. ‘या “एन्काऊंटर स्पेशल” अधिकाऱ्याने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का?, त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?, कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?, कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे!’ असे अनेक सवाल त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.
या "एन्काऊंटर स्पेशल" अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच
खंडणी वसूल केली होती का?
त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?
कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?
कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?
सत्य समोर यायला हवे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 15, 2021
दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी (५ मार्च) रोजी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. हिरेन यांनी स्वतः जीवन संपवल्याचं स्पष्टीकरण सुरुवातीला राज्य सरकारने दिलं होतं. मात्र, त्यांच्या मृत्यूबद्दल हिरेन यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षाने शंका उपस्थित केल्या होत्या. आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांचं नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले होते.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नवनीत राणांनीही लिहिलं अमित शाहांना पत्र
- विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग !
- प्रकरण अंगलट येताच अनिल बोंडेंनी पोलिसांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून घेतला यु-टर्न !
- सचिन वाझेंसह वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी नितेश राणे का करत आहेत ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

