मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे.
यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब हे देखील वर्षावर दाखल झाले होते. यामुळे उद्धव ठाकरे एकामागे एक नेत्यांच्या भेटी घेत असतानाच वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक देखील पार पडत आहे.
या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहिले आहेत. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबे यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर, लगेचच मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे, राजकीय बदलांसह पोलीस विभागाबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही मोठा निर्णय घेणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान
- चर्चांना पूर्णविराम ! अखेर बुमराह विवाहबंधनात अडकला; पहा फोटो
- प्रकरण अंगलट येताच अनिल बोंडेंनी पोलिसांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून घेतला यु-टर्न !
- सचिन वाझेंसह वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी नितेश राणे का करत आहेत ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

