Share

‘येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल’

Published On: 

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा सुरू होती. त्यानंतर अनेक नावे समोर येत होती. मात्र चर्चेत आलेल्या सर्व नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांच्या हाती उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र सोपवण्यात आली.

त्यांनतर १४ मार्च रोजी ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली. यावेळी मोदी यांची स्तुती करत ते म्हणले की, ‘एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात.’

तर, ‘ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे येणाऱ्या काळात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल,’ असंही रावत भाषणात बोलताना म्हणाले.

मागील आठवड्यामध्येच तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ८ मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा असल्याने भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली देखील केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!