कोल्हापूर : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
मात्र, आता या महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती होत आली आहे. या काळात काँग्रेसची नाराजी, खुद्द काही शिवसेना नेत्यांची धुसफूस, पक्षबदल अशा घटनांना सामोरं जात महाविकास आघाडीचं सरकार मात्र स्थिर राहिलं. येत्या काळात अनेक स्थानिक पातळीच्या निवडणुका राज्यांमध्ये पार पडणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीतील हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार कि स्वबळावर यावरून चांगलंच राजकारण तापण्याचं चिन्ह आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारी महिन्यात होऊ शकते. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून ही राजकारणातील दिशाबदलाची नांदी ठरू शकते असं मत देखील काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मेळावा घेत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा इरादा स्पष्ठ केला आहे. कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच, असं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी संबोधित करताना सांगितलं. त्यामुळे, क्षीरसागरांच्या पराभवानंतर थंड पडलेल्या शहर शिवसेनेत नवं चैतन्य निर्माण झालं आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, काँग्रेसनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या सर्व घटना बघता आघाडीत बिघाडी निर्माण होणार? असा प्रश्नांना बळ मिळत असून वरिष्ठ पातळीवरील नेते काय निर्णय घेणार यावरच निवडणुकांमधील गणित स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
- अन्वय नाईक आणि ठाकरेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण ? निलेश राणेंचा गंभीर आरोप
- नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता – राहुल गांधी
- माय फ्रेंड डोलांड ट्रंप आता वाचवायला येणार नाही – सचिन सावंत
- ‘हज यात्रेसाठी सौदी अरेबिया सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर करू’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

