Share

नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता – राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदो मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की,’नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. तसेच राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हीही आवाज बुलंद करा, असं आवाहन या व्हिडीओमधून त्यांनी देशातील जनतेलाही केलं आहे.

‘आज भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. कोरोना संकट आलं आहे. अशातच प्रश्न हा आहे की, ‘बांग्लादेशाची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे कशी? एकवेळ अशी होती की, भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत उत्तम होती. यावर सरकारकडून कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. अस राहुल गांधी म्हणाले आहेत.

तर, पण कोरोना तर बांग्लादेशातही आहे. संपूर्ण जगभरात आहे. अशातच जर कारण कोरोनाचं असेल तर भारत सर्वात मागे कसा राहिला?’ भारताची अर्थव्यवस्था मागे राहण्यात कारण कोविड नाही, कारण नोटबंदी आहे. कारण जीएसटी आहे.’ अस देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!