Share

अन्वय नाईक आणि ठाकरेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण ? निलेश राणेंचा गंभीर आरोप

Published On: 

कणकवली : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये प्रॉपर्टीचा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ” अन्वय नाईक यांच्याबद्दल माहिती काढत असताना त्यांनी एक प्रॉपर्टी ठाकरे कुटुंबाला विकली आहे. आजही प्रॉपर्टी कार्डवर त्याची नोंद आहे. युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करायचा प्रयत्न करतोय, त्याला माहित नाही हे प्रकरण कधी ठाकरेंच्या अंगाशी येईल कळणार नाही.” असा गंभीर दावा निलेश राणे यांनी केल्यामुळे आता हे प्रकरण काही वेगळं वळण घेणार का? जर अन्वय नाईक यांच्या नैराश्यामागे काही वेगळं कारण असेल तर त्यांना न्याय मिळणार का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!