Share

भाजप नेत्यांना सुशांत सारखी भावना अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही? – सचिन सावंत

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. भाजप आमदार राम कदम हे पायी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असून अर्णबच्या सुटकेसाठी ते बाप्पाला साकडं घालणार आहेत. तर याच प्रकरणावरून भाजपच्या इतर नेत्यांनी देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. “सुशांत सिंहबद्दलची भावना भाजपा नेत्यांना दिवंगत अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही? मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या भाजपा नेते इतके विरोधात का? महाराष्ट्रातील मायलेकींना न्याय मिळाला यांचे किरीट सोमय्या आणि राम कदम यांना दुःख झाले. महाराष्ट्राची १३ कोटी जनता माफ करणार नाही” असा घाणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!