🕒 1 min read
नवी दिल्ली: भारत सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात WhatsAppची मालकी असलेल्या फेसबूकने दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावरच शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने WhatsApp ला खडेबोल सुनावले आहेत.
केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात आपली बाजू मांडताना म्हटले की, WhatsApp ही विदेशी व्यावसायीक कंपनी असून भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध करु शकत नाही. भारतातील कायद्याला आव्हान देणारी विदेशी कंपनीची याचिका अयोग्य असल्याचे म्हणत केंद्र सरकारने WhatsApp ला खडसावले आहे.
दरम्यान केंद्र सरकारने आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या फेसबूकच्या याचिकेचा विरोध करत ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली. तर हे नियम असंविधानिक असल्याचे WhatsApp ने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

