नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीममधील वैदर्भीय पदाधिकाऱ्यांकडे विविध आघाड्यांची सूत्रे आली. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे तर, सोशल मीडियाच्या प्रमुखपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली. सोशल मीडियाचे प्रमुखपद यापूर्वीही नागपूरकडे होते. अभिजित सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता विशाल मुत्तेमवार यांच्याकडे आली आहे. मुत्तेमवार यांनी युवक काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवले तसेच, स्वयम संस्था व माय करिअर क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले.
दरम्यान, ‘आमचा सामना भाजपशी आहे, याची जाणीव आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचे आमचा प्रयत्न राहील. येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकाही आहेत. हे लक्षात घेता आम्ही जय्यत तयारी करणार असून, समाजमाध्यमावरील काँग्रेस समर्थकांमध्ये दहा पटीने वाढ करण्याचे नियोजन असल्याची माहिती नवनियुक्त प्रभारी विशाल मुत्तेमवार यांनी माध्यमांना दिली.
भाजपची आयटी टीम खूप तगडी आहे. या टीमकडून खोटा इतिहास पसरवला जातो. खोट्या गोष्टीही खऱ्या वाटाव्या अशा पद्धतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरवल्या जातात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी येत्या दोन वर्षांत राज्यात तळागाळापर्यंत आयटी विभागाचे काम नेणार असल्याची माहिती मुत्तेमवार यांनी दिली. सध्या आयटी विभागाचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आहेत. पण, त्यांची कार्यकारिणी मात्र नाही. येत्या दोन वर्षांत मुंबईतील आयटी वॉररूमपासून गावखेड्यातील बूथपर्यंत आयटी विभागाची टीम तयार करण्यात येईल. ही टीम भाजपला जशास तसे प्रत्युत्तर देईल, असे मुत्तेमवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस मंत्री नितीन राऊत बॅकफुटवर, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट केली डिलीट
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
