गडचिरोली : नागपूर कराराचे प्रलोभन देऊन १ मे १९६० ला विदर्भाला जबरदस्ती महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून विदर्भाचे प्रत्येक क्षेत्रात शोषण करून संपत्तीचे दोहन केले आणि विदर्भाचा वाटा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरला. विदर्भाला गरीब, दरिद्री, आत्महत्याग्रस्त, कुपोषण ग्रस्त, नक्षलग्रस्त केले. विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून प्रस्थापित राजकीय पक्षांनी सामूहिकरीत्या केलेल्या हत्या आहेत. म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांचा बदला घेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात प्रस्थापितांना पराभूत करावे असे आवाहन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राम नेवले यांनी केले. विदर्भ राज्य पार्टीची गडचिरोलीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नद्या, नाले, विहीरी, तलाव अशा जलसंपदा, खनिज संपदा, वनसंपदा, सुपीक जमीन आणि ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा समृद्ध वारसा असलेल्या पौराणिक विदर्भाला नको असलेल्या नागपूर करारानंतर महाराष्ट्राशी जोडून तेव्हापासून आजतागायत प्रस्थापित राजकारण्यांनी विदर्भ कोरडवाहू केला, असा घणाघाती आरोप राम नेवले यांनी केला.
ते म्हणाले, विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील १० वर्षांपासून वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करत आहे. मात्र या आंदोलनाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होत आहे. त्यामुळे समितीने रूपांतरण जय विदर्भ पक्षात केले असून यापुढे जय विदर्भ पार्टी विदर्भातील सर्व निवडणुका या आंदोलन म्हणून लढणार असून पृथक विदर्भाच्या समर्थकांची स्वतंत्र वोट बँक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पार्टीची सभासद नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक जिल्ह्यात एक लक्ष सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस मंत्री नितीन राऊत बॅकफुटवर, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट केली डिलीट
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
