Share

‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

औरंगाबाद : नवीन सुधारित महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार गुंठेवारीधारकांकडून आता महापालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत आपले प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी केली आहे. शासनाने दिलेल्या अर्टी शर्तीनुसार गुंठेवारी संचिका दाखल केल्यास सात दिवसात संबंधित बांधकाम नियमित करावे अन्यथा बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्यात येईल असा इशाराच पांडेयजींनी दिला आहे. मनपा प्रशासनाने घेतलेला गुंठेवारी भागातील नागरिकांच्या मालमत्ता व घरांवर बुलडोझर चालवून घरे पाडण्याचा निर्णय मार्च २०२२ पर्यंत तात्काळ स्थगित करावा अशी मागणी शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या निवेदनात त्यांनी सविस्तर पणे नमुद केले आहे, गुंठेवारी अधिनियमाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ज्या गुंठेवारी योजना नियमित झालेल्या नाहीत, त्या नियमित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे गुंठेवारी घराचे कायदेशीर मालकी हक्कांचे गोरगरीब नागरीकांचे स्वप्न पूर्ण  होणार आहे. मनपा औरंगाबाद क्षेत्रात बहुसंख्य नागरिकांनी अर्ज दिले व १२० रुपये प्रति वर्ग मीटर नुसार पैशांचा भरणा देखील केला असुन त्या प्रकरणांचा निपटारा सुध्दा मनपा प्रशासनाने जलद गतीने केला नाही.

मनपा प्रशासनाच्या घरे पाडण्याच्या इशाऱ्यामुळे नागरिकात दहशत पसरली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबाद मनपा प्रशासनाकडे एकूण किती गुंठेवारी प्रकरण नियमानुकुल करण्यासाठी प्राप्त झाली ? त्याची यादी करावी त्याच बरोबर पैशांचा भरणा किती नागरिकांनी केला आहे ? याचा तक्ता करावा, नागरिकांनी भरलेल्या पैशाचा पुर्ण भरणा झाला असेल त्यास नाहरकत प्रमाणपत्र द्यावे व ज्यांनी पुर्ण पैशांचा भरणा केला नसेल त्यांना अंतिमतः सुचित करावे यासाठी एक रक्कमी पैसे भरणाऱ्यांना काही सूट देता येते काय ? याचा प्रस्ताव तयार करावा. जेणेकरून भीतीचे वातावरण संपुन नागरिकांना दिलासा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!