Share

व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक झाले डाऊन

Published On: 

मुंबई : जगभरात शुक्रवारी रात्री व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक डाऊन झाल्याने एकच गोंधळ उडाला. शुक्रवारी रात्री १०.४० वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. १ तासापेक्षा अधिक वेळ व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मेसेज पाठवण्यास किंवा मिळण्यास अडचण येत होती. मात्र व्हॉट्सअ‍ॅप च्या म्हणण्यानुसार ४९ मिनीटेच असे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कंपनीने या प्रकाराबाबत नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅप सह फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात सुद्धा अनेकांना अडचण आल्या होत्या. मात्र एका तासानंतर या सर्व सेवा पूर्वरत झाल्या आहेत. इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरण्यात येत असलेले व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर जगभरात डाउन झाले होते. व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकही अनेक ठिकाणी डाउन आहे. तिन्ही सेवा या फेसबुकच्याच आहेत. झुकरबर्ग हा त्यांचा मालक आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम एकाचवेळी डाउन झाल्याने ट्वीटरवर मार्क झुकरबर्ग ट्रेंडवर होते. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन हेही ट्वीटर ट्रेंड सुरु झाला होता.

नेमके रात्रीच्या वेळेस हि अडचण आल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. चाटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग साठी यावेळेत अडचण निर्माण झाल्यामुळे बर्याच जनांनी फोन कॉलिंगाचा अधिक वापर करू लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!