Share

‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’

Published On: 

🕒 1 min read

पुणे- देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे.राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे दिसत आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत काल मोठी वाढ झाली आहे. केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

देशात शुक्रवारी ३५,८७० नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशामधून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.भाजपाने ट्विट करुन म्हटले की, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ”ठाकरे सरकराची पोरं हुश्शार…”, असा टोला देखील लगावण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!