Share

‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार

Published On: 

औरंगाबाद : मला शिवसेना कळाली, त्यामुळे खैरेंची गरज नसल्याचा पलटवार अंबादास दानवेंनी शुक्रवारी शेतकरी विकास पॅनलच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. चंद्रकांत खैरे हे आमचे नेते आहेत. माझ्याबद्दल तक्रार असेल तर मला बोलायचे होते. हे पत्रकारांशी बोलायची गरज नव्हती अशी नाराजी  शुक्रवारी आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

मी सहकार क्षेत्रामध्ये खुप नवीन आहे. तर त्यांनी माझ्या विषयीची तक्रार ही मला सांगितली, असती तर ती मी दुरुस्त केली असती. शेतकरी सहकार विकास पॅनल या पत्रकार परिषदेत गुरुवारी चंद्रकांत खैरे यांनी कोण अंबादास ? असा सवाल पत्रकारांना केला होता. आज दानवे यांनी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले की,  खैरे साहेबांनी त्यांच्या मनातील खदखद या वेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. पण आम्ही त्यांना आमचे नेतेच मानतो. तर शेतकरी विकास पॅनलमध्ये सात नेते हे शिवसेनेचे आहेत. आणि या पॅनलमध्ये सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे. म्हणून आम्ही माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ हरिभाऊ बागडे यांना जिल्ह्याचा नेता मानतो. त्यांनी आतापर्यंत जेवढ्या संस्था हातात घेतल्या त्या खुप चांगल्या चालवल्या आहेत.

असे असतानाही आमच्यावर खैरेंनी आरोप केले आहेत. खैरे साहेब केंद्राची नेते आहेत. आणि मी जिल्ह्याचा नेता आहे. माझ्यासारखे दहाहून अधिक नेत्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आणि अजुनही करतात. मी त्यांची कोणतीही तक्रार केली नाही. मात्र खैरे साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे माझी पंचवीस वेळा तक्रार केली आहे, अशी पुष्ठी देखील या वेळी जोडली. गुरुवारी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेनेचे थोडे थोडके नाही तर सात नेते सोबत आहेत. आणि सहकार क्षेत्रामधील माहिती मला नसल्याने मी बागडे यांच्याकडून अनेक गोष्ठी शिकु इच्छीतो. असे ही दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!