Share

कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ८३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख २९ हजार ३८३ इतकी झाली आहे. शहरातील ८०८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ०५ हजार ४७८ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार ६२५ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १२ लाख ९९ हजार ३८६ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १८ हजार ८८८ रुग्णांपैकी ४९९ रुग्ण गंभीर तर ८८४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ०१७ इतकी झाली आहे. ही सर्व माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून दिलेली आहे.

याच भयानक परिस्थितीमुळे पुण्यात निर्बंध अधिकच कडक करण्यात आले आहेत. लग्न समारंभात ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!