🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आणि तिचा चाहता वर्ग यांसाठी रश्मिका नेहमीच सोशल मीडियावर खूप अ;ॅक्टिव असते ती दररोज चाहत्यांसाठी मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी रश्मिकाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे
दक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता रश्मिका बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिका सोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
दरम्यान रश्मिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात नांगर चालवताना दिसत आहे. रश्मिका हे काम मनापासून करताना दिसत आहे. तिचा लूकही संपूर्ण ग्रामीण महिलेसारखा आहे. तिने सैल शर्टसह तेमट (लुंगी सदृश्य वस्त्र) परिधान केले आहे आणि कमरेवर पंचा बांधला आहे. रश्मिकाचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
https://www.instagram.com/p/CMhdl3fJWb9/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले की, ‘गीत ऐका आणि व्हिडीओ बघा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शूटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होते. मला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.’ व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर Eppadi Iruntha Naanga हे गाणे सुरू आहे
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील ‘कुंभकर्ण सरकार’ला कधी जाग येणार ? जागतिक निद्रा दिनी जयंत पाटलांची खोचक टीका !
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

