औरंगाबाद : बीडबायपास रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यात अपघात संख्येत देखील वाढ होत आहे. मग रस्त्याचे काम वेगात करण्यात काय अडचण आहे ? असा सवाल पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना विचारला. या रस्त्यावर होत असलेल्या अपघाताबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष बैठक बोलवून लवकरात लवकर निर्णय घेण्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले.
बीड बायपास रोडवर गेल्या आठवड्यात चार जणांचा बळी गेला आहे. या अपघातांच्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी बीड बायपास रस्त्याची पाहणी केली. त्यात महानुभव चौक, पैठण रोड, एमआयटी कॉलेज चौक, रेणुका माता मंदिर कमान, देवळाई चौक, बाळापुर फाटा या ठिकाणी पाहणी केली. बीड बायपास रोडवरील वाहतूक कशी सुरळीत करता येईल? त्यावर काय तोडगा काढता येईल? याचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपायुक्त मिना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इंजिनिअर प्रशांत अवसरमल, राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष विलास मगरे, कंत्राटदार उपस्थित होते.
या बोलताना डॉ. गुप्ता म्हणाले की, बीड बायपास रोडची पाहणी केली. या रस्त्यावर अपघात कमी करण्यासाठी काय आवश्यक उपाय योजना आहे. त्यावर चर्चा करण्यात आली लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या जड वाहतूकीबाबत पुर्वीचे आदेश लागू राहतील. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात बदल करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मशाल रॅलीचा औरंगाबादेत समारोप, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- भारताच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, धन्यवाद सीतारामनजी – अमृता फडणवीस
- …म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत फडणवीसांचीही झाली नाही – अजित पवार
- ‘हा अर्थसंकल्प नसून आगामी काळात 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे’
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

