Share

‘हा अर्थसंकल्प नसून आगामी काळात 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे’

Published On: 

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२१–२०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण, रेल्वे, क्रीडा, वाहतुक आदी क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शेती आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प. बंगाल, तामिळनाडू, आसाम या राज्यावरही योजनांची खैरात केली आहे. शेतकऱ्यांसाठी दीडपट ‘एमएसपी’ची तरदूत केली आहे. एकंदरीत सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना खुश केले आहे. अर्थसंकल्प जाहीर करायाल सुरुवात झाल्यापासून त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. विरोधक यावरून सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही बजेट बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. ‘निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प नसून आगामी काळात 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही ठोस नसल्याने राज्याच्या पदरी निराशा आली आहे. थोडक्यात अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठेही दिसत नसून, महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाली आहे,’ अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

‘खरं तर अर्थसंकल्पातून देशाच्या आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित व्हायला हवी. अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काय दिले, गरीबांना काय दिले, विविध घटकातील विकासाच्या बाबतीत नेमके कोणते निर्णय घेतले, गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला सावरुन घेण्यासाठी काय उपाय केले याबाबत या अर्थसंकल्पात काहीही दिसत नाही,’ असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!