Share

मशाल रॅलीचा औरंगाबादेत समारोप, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव व कोल्हापूर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान वाहन मशाल फेरी काढण्यात आली. या रॅलीचा समारोप क्रांतीचौकात झाला. यानंतर आंदोलकानी ठिय्या देण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे, मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. साष्टपिंपळगाव येथून चार वाहनांमधून मशाल घेऊन आलेल्या २० आंदोलकांनी क्रांतीचौकात रॅलीचा समारोप केला. त्याचबरोबर ठिय्या देण्यास सुरुवात केली.

पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे यांनी ठिय्या आंदोलनाला परवानगी नसल्याने आंदोलन करू नका, असे सांगितले. मात्र त्यांचे न ऐकता घोषणा सुरूच ठेवल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि क्रांतिचौक ठाण्यात नेले. दरम्यान, मशाल रॅली येणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता क्रांतीचौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!