🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. देशाच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
‘भारताच्या मागील १०० वर्षांत असं अर्थसंकल्प सादर झालेलं नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील ,’ असं कौतुक देखील अमृतीत फडणवीस यांनी केलं आह. दरम्यान, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा सीतारामन यांनी केल्यानंतर फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून नाशिककर व नागपूरकरांचं अभिनंदन केलं आहे.
Thank you FM Smt @nsitharaman for presenting budget in a manner never seen in a 100 years in India.
All countries in the world will now observe and learn the art of giving impetus to growth without levying additional tax. #Budget2021 #UnionBudget2021 #NirmalaSitaraman— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- संतापजनक: यवतमाळ मध्ये पोलिओ ऐवजी लहानग्यांना पाजल सॅनिटायझर
- ‘बजेटच्या हृदयात गाव आणि शेतकऱ्यांचा विकास आहे’
- …म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत फडणवीसांचीही झाली नाही – अजित पवार
- भारत पाकिस्तानला देखील पुरवणार कोरोना लस !
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
