बीड : आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच आणि मीच केले असे, असे म्हणायची सवय लागल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजप आमदार सुरेश धसांवर केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीला कौल दिला आहे. परंतु, काही विरोधक खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे जनतेला दिशाभूल करतात. खोटे आकडे सांगून सर्वच ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्याचे सांगत आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार आजबे म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादीला, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानतात. त्यामुळे मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आलेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत. त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असे आजबे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !
- ‘मै तेरा नोबिता, तू मेरी शिजुका’ अखेर शिजुका झाली नोबिताची
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- अधिकारी लोंढे यांच्यामुळे पूर्वीही एका ग्रामसेवकाने केली होती आत्महत्या
- घरी येणार असेल तर चांगले कपडे घालूनच ये; रहाणेच्या बायकोचा ‘स्वीट’ सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
