Share

‘मै तेरा नोबिता, तू मेरी शिजुका’ अखेर शिजुका झाली नोबिताची

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कार्टून शो आणि लहानमुले याचं नात आणि हे विश्वच काही वेगळ असत. मुले मोठी झाली तरी देखील कार्टून त्यांच्या आठवणींचा अविभाज्य भाग असतो. यामध्ये अनेक कार्टून शो चा उल्लेख करता येईल. तर भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्टून शोमध्ये डोरेमॉन हा एक आहे. या शोमधील डोरेमॉन, नोबिता, शिजुका, जियान, आणि सुनिओ हे मुख्य पात्र दाखवण्यात येतात.

लहान मुलांना चा हिरो म्हणजे नोबिता आणि त्याला वेळोवेळी मदत करणारा सर्वांचा लाडका डोरेमॉन. मात्र या गोष्टीत नोबिता शिजुकावर किती प्रेम करतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. शिजुकाला इम्प्रेस करण्यासाठी नोबिता नेहमीच प्रयत्न करत असतो. नोबिताच्या चुकीमुळे नेहमीच शिजुका आणि त्याच्यामध्ये भांडण होतात.

डोरेमॉनच्या मदतीने नोबिता शिजुकाला इम्प्रेस करण्यात सफल ठरतो. तर आता लवकरच नोबिता आणि शिजुका कायमचे एकत्र येणार आहेत. लवकरच डोरेमॉनचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नोबिता आणि शिजुकाचे लग्न होणार आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या डोरेमॉनच्या चित्रपटाचा हा सीक्वेल असणार आहे. या चित्रपटाच नाव ‘ स्टन्ड बाय मी डोरेमॉन 2’ असे असणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात डोरेमॉन आणि नोबिताची भेट कशी झाली, त्यांची मजा-मस्ती दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये नोबिता आणि त्याची जिवलग मैत्रिण शिजुका यांचे लग्न होणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२० मध्ये जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर फेब्रुवारी २०२१मध्ये इंडोनेशियात प्रदर्शित होणार आहे. सीबीआय पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या नंतर नोबिता आणि शिजूकाचे लग्न सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!