Share

अधिकारी लोंढे यांच्यामुळे पूर्वीही एका ग्रामसेवकाने केली होती आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : पैठण पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवक संजय शिंदे यांनी विष पिऊन आत्महत्या केली. गटविकास अधिकारी व्ही. डी. लोंढे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यापूर्वीसुद्धा सदर गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिल्याची चर्चा आहे. तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली होती. त्याचीही चौकशी सध्या सुरू आहे.

पैठण तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दरमहा पैशांची मागणी करीत असलेले पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. लोंढे हे ग्रामसेवकांना दरमहा मिळत असलेल्या पगारातून व वित्त आयोगातील काढण्यात आलेल्या धनादेशातून पैशांची मागणी करतात. तसेच पैशांची मागणी पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत मधून अभिलेख स्वतः लोंढे जमा करून घेतात व ग्रामसेवकाना पैशांची मागणी करून मानसिक त्रास देतात, असा आरोप त्यांच्यावर ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांनी केला आहे.

यापूर्वीसुद्धा सदर गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला असून तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली त्याचीही चौकशी सध्या सुरू आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पंचायत समितीत कार्यरत असलेले गटविकास अधिकारी लोंढेमुळे दुसऱ्या ग्रामविकास अधिकारी बिडकीन ग्रामपंचायतमध्ये असलेले संजय हरिभाऊ शिंदे यांनी आत्महत्या केली आहे. या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!