🕒 1 min read
सातारा:- देशात सगळीकडेच नामांरावरून वादंग निर्माण होत आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. औरंगाबदचे संभाजीनगर करा या मागणीवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते यामध्ये सहभागी आहेत. इकडे साताऱ्यात मात्र एकापाठोपाठ एक नामकरणांची प्रक्रिया सुरु झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा ग्रेड सेपरेटरच्या सर्व भुयारी मार्गांना महान व्यक्तींची नावे दिली आहेत. आता उदयनराजे समर्थकांनी पुणे बंगळुरु महामार्गावरील सातारा पालिका हद्दीतल्या ‘बॉम्बे रेस्टॉरंट’ चौकातील उड्डाण पुलाचे ‘श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब’ उड्डाणपूल असं नामकरण केलं आहे.
सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: उदयनराजे आणि त्यांचे समर्थक आक्रमक अंदाजात दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे काही महिने साईडलाईन झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर भोसले यांना राज्यसभा मिळाली. आता तोंडावर सातारा पालिका निवडणूक देखील आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून साताऱ्यातील विविध विकासकामांचा आढावा घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटच्या पाहणीचे निमित्त करुन उदयनराजेंनी थेट उद्घाटन उरकून टाकलं होते.
सातारा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या साताऱ्यात राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यात आता वरचेवर उदयनराजेंच्या आढावा बैठका, विकासकामांची पाहणी यांमुळे पालिका निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाच्या चारही प्रवेशद्वारांच्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज भुयारी मार्ग अशा नावांचे फलक लावले गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- व्हाइट हाऊस मधून बाहेर पडताच चीनचा ट्रम्प यांना मोठा झटका
- मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून विष घेतलेल्या ग्रामसेवक शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री

