🕒 1 min read
मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.
भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत प्रभारी कर्णधार म्हणून मोठे यश मिळवलेल्या अजिंक्य रहाणेचे विशेष स्वागत मुंबईत करण्यात आले. सध्या त्याच्या या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत जाऊन चारी मुंड्या चीत केलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं आज मुंबईतल्या घरी जंगी स्वागत झालं. त्याच्या स्वागताला त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार तसंच माटुंग्याच्या सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते. यावेळी अजिंक्यच्या कामगिरीची अभिमान, उत्साह तिथे उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अजिंक्यला हे स्वागत अनपेक्षित होतं. त्यामुळे स्वागतानंतर त्याची प्रतिक्रिया खास बोलकी होती.
जंगी स्वागतानंतर अजिंक्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कुटुंबीय, मित्र परिवार, आप्तेष्ट, सोसायटीतील रहिवासी यांच्या स्वागताला उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “आज मला खरंच खूप आनंद होतोय… माझ्यासाठी नक्कीच हा क्षण आनंददायी आहे. आमच्या या कामगिरीमागे सगळ्या देशवासियांचा हात आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं…”
यावेळी अजिंक्यने खास प्रायव्हेट सिक्रेटही उघड करुन सांगितलं. “ज्यावेळी अजिंक्यचं विमान मुंबईत उतरणार असं ठरलं त्यावेळी त्याची पत्नी राधिकाने त्याला फोन करुन घरी येताना चांगली कपडे घालून घे, असं सांगितलं. तिच्या फोननंतर मला काही कळेना की चांगली कपडे घातल्याने काय फरक पडेल? तिला मी जेव्हा यावर विचारलं त्यावर तीने मला उत्तर दिलं की मुलगी आर्याला बरं वाटेल. ती आनंदी होईल… खूश होईल…”
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !
- ‘मै तेरा नोबिता, तू मेरी शिजुका’ अखेर शिजुका झाली नोबिताची
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- अधिकारी लोंढे यांच्यामुळे पूर्वीही एका ग्रामसेवकाने केली होती आत्महत्या
- पुणे भाजपमध्ये मोठी बंडाळी ? अजित पवार म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
