Share

‘भारतात असते तर या लोकांनी काय केलं असतं ?’ मीना हॅरीस यांनी केली भीती व्यक्त !

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, विदेशातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत असताना मात्र अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन केल होत. यानंतर अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि व्यवसायाने वकिल असलेल्या मीना हॅरिस यांनींही शेतकरी आंदोलनावर टि्वट केले आहे. मात्र त्यांनी कृषी कायद्यांना नाही तर शेतकऱ्यांना दिला होता.

https://twitter.com/meenaharris/status/1357397237127544835

जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यांपूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशावर हल्ला होत आहे. हा काही योगायोग नाही. इंटरनेट शटडाऊन आणि भारतातील शेतकऱ्यांवर होणारा हिंसाचार पाहून आपल्याला संताप आला पाहिजे. याविरोधात आवाज उठवायला हवा, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी मीना हॅरीस यांनी ‘मी भारतीय शेतकऱ्यांच्या मानवाधिकारांचं समर्थन करत आहे आणि बघा मला कशा प्रतिक्रिया मिळतायेत’ असं ट्विट केलं. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, ‘मी घाबरणार नाही आणि गप्पही बसणार नाही’ असं म्हटलं.

https://twitter.com/meenaharris/status/1357769417619247104

https://twitter.com/meenaharris/status/1357772428982669312

यामध्ये भारतातून सरकारला पाठींबा देत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा विरोध करण्यात येत असताना काही संघटनांनी मीना हॅरीसचा विरोध केला होता. सोबतच त्यांचे पोस्टरही जाळण्यात आले. स्वतःचा फोटो जाळताना बघून ‘तुमचा फोटो कट्टरपंथी जमावाकडून जाळताना बघणं विचित्र आहे…विचार करा जर आम्ही भारतात असतो तर या लोकांनी काय केलं असतं??… “हे केवळ कृषी धोरणाबद्दल नाहीये. अल्पसंख्याकांच्या छळाबद्दल देखील आहे. ही पोलिस हिंसा, अतिरेकी राष्ट्रवाद आणि कामगार हक्कांवर हल्ले … ही जागतिक हुकूमशाही आहे. त्यामुळे मला तुमच्या मुद्द्यांपासून दूर राहण्यास सांगू नका. हे सगळे आमचे मुद्दे आहेत”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.’ यामध्ये आंदोलन करणाऱ्या २३ वर्षांच्या नवदीप कौरला अटक त्याला जामिन न देता २० दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून तुरूंगात ठेवलं आहे. असं ट्विट करत नवदीप कौरसाठी मीना हॅरीस मैदानात उतरल्य होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!