Share

राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले आहे. सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत होते.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.‘राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, पण आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल’, असे म्हणत फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत दिले आहेत.

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा या पदासाठी निवडणूक होऊ शकते अशी शक्यता आहे आणि यात पुन्हा एकदा आघाडी सरकारची कसोटी लागण्याची शक्यता आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता आणखी एक उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंबंधीच्या हालचाली सुरु असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येवू लागल्या आहेत.’राज्यात शिवसेना राष्ट्रवादी , काँग्रेसचे समान सरकार आहे. त्यामुळे सभापतीपद हे काँग्रेसकडेच आहे. त्यामध्ये दोन्ही पक्ष सहकार्य करत आहेत. सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’ अशी मागणीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

आजच्या सामानाच्या अग्रलेख पाहिला तर यात देखील सूचक इशारा देण्यात आला आहे. ‘काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल.यामुळे देखील पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा होऊ लागली आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल पहिले तर भाजप क्रमांक एकचा पक्ष असला तरीही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पक्षीय बलापुढे भाजपला बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठणे अवघड आहे. अशा परिस्थितीत भाजप पुढे एखाद्या पक्षासोबत युती करणे किंवा एखादा मोठा नाराजांचा गट फोडणे याशिवाय पर्याय उरत नाही.सद्यस्थिती पाहता असे काही होऊ शकेल अशी दूरपर्यंत शक्यता वाटत नाही.

हे सरकार एक महिनाही चालणार नाही असे भाजपकडून सांगण्यात येत होते मात्र या सरकारने एक वर्ष तर पूर्ण केलेच मात्र अनेक लोकोपयोगी कामे देखील कामे देखील केल्याने त्यांचा जनाधार देखील वाढत असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे.खा.शरद पवार,उद्धव ठाकरे,संजय राऊत,बाळासाहेब थोरात यासारखे धुरंधर नेते या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असताना या सरकारवर संकटाचे ढग निर्माण होतील अशीही शक्यता दिसत नाही.मग फडणविसांनी हे असे वक्तव्य का केले असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

पदवीधर शिक्षकच्या निवडणुकीत भाजपला अपयश आले आहे. आगामी काळात महानगरपालिका निवडणुका आहेत. सत्ताधारिक पक्षांकडे अनेक नेते आकर्षित होऊन पक्ष प्रवेश करत आहेत हे रोखणे भाजपसाठी एक आव्हान आहे.यामुळेच पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणे,एक आशा निर्माण करणे हाच या वक्तव्यामागे उद्देश असू शकेल अशी जाणकारांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!