🕒 1 min read
मुंबई:- गुरुवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. यानंतर काल दुपारी नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे.
काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याच बरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले, असं म्हणत पटोलेंना सामन्यातून शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.
नाना पटोले यांच्यासोबत महाराष्ट्रासाठी टीम काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. नाना हे प्रांतिक अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल. काँग्रेसने त्यांच्या कार्याची नवी पद्धत स्वीकारली आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मला भारतरत्न देण्याचं कॅम्पेन थांबवा, देशाच्या विकासात योगदान देता येतंय हे माझं भाग्य”
- कोरोनामुळे उशिरा मिळालेला विकास निधी; खर्चासाठी ३१ मार्चची मुदत
- ‘या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे,’ शेतकरी आंदोलनावर युनोचा सरकारला सल्ल
- “सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?”
- कोरोनामुळे उशिरा मिळालेला विकास निधी; खर्चासाठी ३१ मार्चची मुदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
